कामगारांसाठी तलासरीत निवारा केंद्र

डहाणू - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून पायी निघालेले परराज्यातील शेकडो कामगार महाराष्ट्र-गुजरात राज्याची सीमा सील झाल्याने अडकले आहेत. त्यांच्यासाठी सरकारतर्फे तलासरी येथे निवारा केंद्र सुरू केले आहे.आपल्या घराकडे पायीच निघालेल्या कामगारांना राष्ट्रीय महामार्गावर थांबवून ठेवले जात आहे. त्यांच्या जेवण-झोपण्याची सोय व्हावी यासाठी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेली शासकीय वसतिगृहाची तीन मजली नवी इमारत निवारा केंद्र म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तेथे पन्नास खोल्या आहेत. तेथे वैद्यकीय सुविधा, गाद्या, साबण, सॅनिटायझर आणि भोजन उपलब्ध केल्याची माहिती तहसीलदार डॉ. स्वाती घोंगडे यांनी दिली.तेथे असलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था काही नागरिक आणि सामाजिक संस्था करत आहेत. या निवारा केंद्राचे काम महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून पाहिले जात आहे. प्रत्येक खोलीत बारा कामगार याप्रमाणे निवारा केंद्रात सुमारे सहाशे जणांना ठेवण्यात आले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget