पालघर घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न झाला ही दुर्देवाची गोष्ट - गृहमंत्री अनिल देशमुख

वाधवान कुटुंबियांना सीबीआयच्या ताब्यात देणार
मुंबई - गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघर मॉब लिंचिंग घटना तसेच लॉकडाऊन नियम तोडणाऱ्या वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाईन कालावधी आज संपत असताना त्यांना सीबीआयच्या ताब्यात देणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सध्या त्यांना महाबळेश्वर येथील जवळच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. आज दुपारी वाधवान कुटुंबियांना सीबीआयच्या ताब्यात देण्यात येईल.
पालघर मॉब लिंचिंग घटनेवर देखील गृहमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले. ही घटना झाल्यानंतर ८ तासांच्या आत १०१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी पळून जाण्याचा आणि लपण्याचा प्रयत्न करत होती. पण पोलिसांनी सतर्कता दाखवत यांना ताब्यात घेतले आहे. या १०१ लोकांची यादी गृहमंत्र्यांनी जाहीर केली. यामध्ये एकही व्यक्ती मुस्लिम समाजाचा नव्हता असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे. असे असताना देखील या घटनेला जातीचा रंग देण्याचा प्रयत्न झाला ही दुर्देवाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी लढा देत असताना काहीजण राजकारण करत असल्याचे ते म्हणाले. 
आज दुपारी २ वाजता वाधवान कुटुंबियांचा क्वारंटाईनचा कालावधी संपत असून,त्यांना ताब्यात घेण्याचे पत्र इंफोर्समेंट आणि सीबीआयला देण्यात आले आहे. सीबीआय त्यांना घेऊन जाईपर्यंत ते पोलीस खात्याच्या ताब्यात असतील. महाराष्ट्र शासन यांना कुठेही पळू देणार नसल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget