सिंधुदुर्गात २१ एप्रिल पासून संचारबंदी मध्ये शिथिलता

सिंधुदुर्ग - केंद्र सरकारने ३ मे पर्यंत लॉक डाऊन जाहीर केले आहे. मात्र ज्या जिल्हयामध्ये कोरोनाचे रुग्ण नाहीत अशा जिल्हयामध्ये २० तारखेनंतर लॉक डाऊन मध्ये शिथिलीकरण करण्याचे पंतप्रधानांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून नियमावली निश्चित झाली असून, हे शिथिलीकरण लोकांसाठी असणार नाही. केवळ आवश्यक असलेली शासकीय कामे पूर्ण करण्यासाठी हे शिथिलीकरण दिले जाणार असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. 
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी आम शिवराम दळवी, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले आजची बैठक २० तारीख नंतर जिल्हयात कशाप्रकारे संचारबंदीला शिथीलता द्यावी. याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी घेण्यात आली होती. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचिही शीथिलीकरण संदर्भातील नियमावली जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहे. या नियमावली वर चर्चा करून जिल्हयातील जी अति महत्त्वाची कामे करणे आवश्यक आहे, अशा कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. २१ तारखेपासून जिल्हयामध्ये संचारबंदी मध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र मोकळिक केवळ शासकीय कामांसाठी असणार आहे. लोकांनी घरातून बाहेर पडायचे नाही आधी सर्व अटी तशाच राहणार आहेत. बांधकाम, रस्ते, शहरी भागातील जुनी कामे, तसेच ग्रामीण भागातील नवीन कामे, आंबा फॅक्टरी, काजू फॅक्टरी, मच्छी व्यवसाय सुरू करणे आधी विविध कामांसाठी ही मोकळिक दिली जाणार आहे.पालकमंत्री ना सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हयात अन्नधान्याचा पुरवठा बाबत आढावा घेतला जिल्हयात आवश्यक तेवढे अन्नधान्य असून ते प्राधान्य क्रम जनतेला प्राप्त झाले आहे. मात्र केसरी कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्य दिले जाणार हे धान्य मे आणि जून या दोन महिन्यातच दिले जाणार आहे. त्यापूर्वी ते कोणालाही मिळणार नाही असेही सामंत यांनी स्पष्ट केले. जिल्हयात सध्या जी कामे करणे आवश्यक आहे अशा सर्व कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे ही कामे २० तारीखेनंतर जिल्हयात सुरू होतील.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget