संकटाच्या काळात केंद्रीय मंत्र्यांनी घाणेरडे राजकारण करू नये - ममता बॅनर्जी

कोलकाता - कोरोनाविरोधात राज्य सरकार लढा देत असून या संकटाच्या काळात केंद्रीय मंत्री आणि अन्य नेत्यांनी शिष्टाचार पाळावा. वादग्रस्त वक्तव्य करू नयेत, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. शिवाय या बाबत केंद्रीय मंत्र्यांना सुचना कराव्यात अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. 
आम्ही केंद्राला पूर्ण सहकार्य करीत आहोत. केंद्रीय मंत्र्यांनीदेखील सभ्यता पाळली पाहिजे. कुणीही घाणेरडे राजकारण करू नये. संकटाच्या काळात एकत्र काम करूया, ही राजकारणाची वेळ नाही, असे बॅनर्जी पत्रकार परिषदेमध्ये म्हणाल्या.केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर तथ्य दाबण्याचा आरोप केला होता. भाजपचे नेते दिलीप घोष यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाने राज्यपाल जगदीप धनखार यांच्याबरोबर कोरोनासंबधीत राज्यातील परिस्थितीबाबतचे मुद्दे उपस्थित केले होते. तसेच राज्यात अंत्यत कमी प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या असून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. बॅनर्जी सरकार वास्तवीक माहिती दडपून टाकत असल्याचा आरोप या शिष्टमंडळाने केला होता.दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३४ असून ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये देशात ९०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८,३५६ वर पोहोचली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget