लॉकडाऊन दरम्यान बर्थ-डे पार्टी; भाजप नगरसेवकास अटक

पनवेल - देशभरात लॉकडाऊन असताना व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन राज्य सरकारकडून सातत्यानं केले जात असतानाही अनेक ठिकाणी याचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. लोकप्रतिनिधीही यात मागे नाहीत. लॉकडाऊनचे उल्लंघन करून मित्रांसोबत वाढदिवस साजरा करणारे पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांना अटक करण्यात आली आहे. 
पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्टी आयोजित केली जाण्याची राज्यातील ही पहिलीच घटना आहे. बहिरा हे आपल्या दहा मित्रांसोबत वाढदिवसाची पार्टी करत असल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधींनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना बहिरा यांनी हा प्रकार केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांना याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार असून ते काय भूमिका घेतात, याकडं लक्ष लागले आहे. 

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget