केंद्राने जीएसटीचे १६ हजार कोटीं राज्याला द्यावे - बाळासाहेब थोरात

मुंबई - केंद्र सरकारच्या अगोदरच आम्ही कोरोनाच्या लढाईविरोधात सावध होतो. म्हणूनच आम्ही एक आठवड्यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळले. आज आम्ही केवळ कोरोनाच्या संकटावरच पूर्ण लक्ष केंद्रित करत आहोत. परंतु, केंद्राकडून आम्ही पीपीई कीटसह इतर साहित्य मागतोय तेही केंद्र वेळेवर देत नाही. किमान आता केंद्राने जीएसटीचे आमचे १६ हजार कोटी रूपये द्यावेत, अशी मागणी महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज केली. तसेच आम्ही राज्याला सुरक्षीत ठेवून कोरोनाचे संकट परतवून लावू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची ऑनलाईन पत्रकार आयोजित केली होती. त्यावेळी थोरात बोलत होते.राज्यातील जनता अडचणीत असल्याने आमचे सर्व लक्ष कोरोनावर आहे. त्यामुळे राज्यात किती महसूल बुडत आहे याकडे पाहत नाही. हे संकट दूर झाल्यावर आम्ही महसुलावर पुन्हा लक्ष देवू, असेही थोरात यांनी स्पष्ट केले.दरम्यान, चव्हाण म्हणाले, की कालच्या घटनेला आम्ही रेल्वेमंत्र्यांवर आरोप केला नाही. परंतु, इतक्या मोठ्या गर्दीला आवरणे कठीण होते. इथे सगळ्या कम्युनिटीचे लोक होते. जमलेल्या लोकांना आपल्याला घरी जायचे होते. ते कोणत्या एका धर्माचेच लोक नव्हते. ही बाबही लक्षात घेतली पाहिजे. रेल्वे जाणार आहे म्हणून लोक बाहेर आले होते. परंतु, यावर आम्हाला राजकारण करायचे नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget