वसई-विरार, मिरा-भाईंदरमध्ये रुग्णांची संख्या वाढली

विरार - शनिवारी वसई विरार शहरात ५ तर मिरा भाईंदर शहरात २ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे वसईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३६ एवढी झाली आहे. तर मिरा भाईंदरमधील रुग्णांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली आहे.विरार मध्ये एक परिचारिका, एक शेअर दलाल तसेच एका करोनाबाधित रुग्णाच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. तर नालासोपारा येथे करोनाबाधित रुग्णाच्या १३ वर्षीय मुलाला, तर वसईतील करोनाने मरण पावलेल्या व्यक्तीच्या २५ वर्षीय मुलाला करोनाची लागण झाली आहे. यामुळे वसई विरारमधील करोनाबाधीत रुग्णांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे.मिरा भाईंदर शहरातही शनिवारी करोनाचे दोन नवीन रुग्ण समोर आले आहे. यापैकी एक रुग्ण मिरा रोड पूर्वेला तर दुसरा रुग्ण भाईंदर पश्चिमेला आढळला आहे. यानंतर मिरा भाईंदरमधील रुग्णसंख्या ३२ एवढी झाली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget