लॉकडाऊन काळात राज्यात २३० सायबर गुन्हे दाखल

मुंबई - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अफवा, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. अशा गुन्हेगारांच्या विरोधात महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाने राज्यात २३० गुन्हे दाखल केले आहेत. 
राज्यात सर्वाधिक सायबर गुन्हे बीड जिल्ह्यात २७ असून, पुणे ग्रामीण १७, मुंबई १६, कोल्हापूर १६, जळगाव १३, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा ८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,नवी मुंबई ५, सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १, धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे . 
राज्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०६ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडिया ज्यात ऑडिओ क्लिप व यु-ट्यूब सारख्या माध्यमांचा गैरवापर केल्या प्रकरणी ४० गुन्हे दाखल झाले आहेत. सायबर पोलिसांनी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget