लॉकडाऊनमध्ये तळीरामांची पंचाईत...

जगभरात कोरोनाने थैमान घातले असून,कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे.पुन्हा देशभरात लॉकडाऊन होणार असे ऐकल्यावर कित्येकांची धास्ती वाढली.आता देशात तीन मी पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने तळीरामांच्या संयमाचा बांध सुटत चालला आहे. देशी आणि विदेशी मद्यविक्री बंद केल्याने तळीरामांनी मिळेल तिथून दारु घेताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक गावागावातील देशी दारु तयार करण्याचे कामही पोलिसांनी छापे टाकून बंद पाडले आहे, त्यामुळे तळीरामांची चांगलीच पंचाईत झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दारूची दुकाने फोडून चोरी केल्याचे उघड झाले आहे.तर, कित्येक ठिकाणी अत्यावश्यक सेवेच्या दूध वाहतुकीचे लेबल लावून गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.त्यामुळे सध्या राज्यभरात दारू मिळेनाशी झाली आहे.याचाच फायदा दारू विक्रेते घेत आहेत दारूचा काळाबाजार करून ती दहापटीने विकली जात आहे आणि घेणारे घेत आहेत.त्यामुळे तळीरामाच्या खिशाला कात्री जरी बसत असेल तरी,राज्य शासनाच्या तिजोरीला देखील भुर्दंड सोसावा लागत आहे.दारूचा काळाबाजार करून मोठी रक्कम मिळत असल्याने अवैध दारू व्यावसायिकांची संख्या वाढली आहे.सध्या लॉकडाऊनमुळे बार, दारूची दुकाने बंद आहेत. बंदी असली तरीही मुंबईत मोठ्या प्रमाणात अनेकजण दारू विकत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील विविध उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम झाला आहे. महसूल कमी झाल्याने सरकारलाही मोठा फटका बसला आहे. मद्यविक्री आणि त्यातून मिळणारा महसूल बंद झाला. मात्र आसाम आणि मेघालयात सोमवारपासून मद्य विक्रीची दुकाने दिवसभरातील ठराविक काळासाठी सुरू करण्यात आली आहेत, तर आता पंजाब सरकारनेही पंजाबमध्ये दारूची दुकाने उघडण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. आसाममध्ये दारुची दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत, मेघालयात १७ एप्रिलपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत उघडी राहतील. पंजाब सरकारच्या आर्थिक स्थितीचा विचार करता दारूची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. लॉकडाऊनमुळे प्रत्येक राज्याचे मोठ्या प्रमाणात महसुलाचे नुकसान होत आहे. मद्याची दुकाने दररोज ३ ते ४ तास उघडी राहतील, असा प्रस्ताव आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या तळीरामांना आता दिलासा मिळणार आहे, तर कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सरकारांच्या तिजोरीत दोन पैसे जमा होणार आहेत. महिनाभरापासून महाराष्ट्रातील सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच राज्य सरकारचे उत्पन्नही मोठ्या प्रमाण घटले आहे. एकीकडे कोरोनासारख्या भयंकर आव्हानाविरुद्ध लढत असताना राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. अशा स्थितीत राज्यातील महसूल वाढवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.दारूमुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.मात्र दारूची दुकाने सुरू करण्याबाबत शासन पातळीवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यानंतर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पण शासनाचे नियम अनेक ठिकाणी धाब्यावर बसविल्याचे पाहायला मिळाले. या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर धाडसत्र सुरु ठेवले असून आतापर्यंत कित्येक कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना वारंवार सूचना देऊन आणि सांगूनही नियमाचे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. त्याचवेळी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपन्यांनी (सीआयएबीसी) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यभरात मद्यविक्री व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. मद्यावरील कर राज्य सरकारच्या कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. यामुळे राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र आता लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी आहे. या काळात मद्यविक्री पूर्णत: बंद असल्यामुळे महसुलात देखील घट झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले. यामुळे टप्प्याटप्प्याने राज्यभरातील दारूबंदी उठवावी, अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे. तर,कोणत्याही राज्यात किंवा जिल्ह्यात दारुबंदी झाल्यास त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दारुचा काळाबाजार होत असल्याचे चित्र आहे. दारू पिऊ नये, बाळगू नये आणि विकू नये असे कडक नियम असले तरी अंमलबजावणी व्यवस्थित नसल्याने, बंदीचा फज्जा उडाला आहे. लॉकडाउनच्या काळात तळीरामांना फटका बसला आहे कारण दारू आणायची म्हंटली तर किमतीच्या दहा पट रक्कम मोजावी लागत असल्याने दारूच्या आहारी गेलेल्या तळीरामांचा बोजवारा उडाला आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने काळाबाजार करणाऱ्यांनी दारूच्या आहारी गेले३ल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात लुटून स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या आहेत परंतु,शासनाला एक दमडीही मिळालेली नाही.हे राज्य सरकारने लक्षात घेऊन राज्यात दारूची दुकाने सुरु करण्यास परबनगी द्यावी जेणे करून राज्य शासनाला महसूल मिळेल आणि काळाबाजार करणाऱ्यांवर चाफ बसेल एवढे मात्र नक्की.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget