विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर सोलापूर पोलिसांची कारवाई

सोलापूर - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वांनी घरीच राहण्याच्या सूचना सर्वत्र दिल्या जात आहेत. मात्र लोक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणांऱ्या विरोधात सोलापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. सोलापूरात पोलिसांनी आज (रविवार) सकाळपासून जवळपास ५०० दूचाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.शनिवारी सोलापूरकरांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच कडक कारवाईला सुरूवात केली. शनिवारी बॅंकाच्या समोरही मोठी गर्दी झाली होती. जीवनावश्यक गोष्टींचे कारण पुढे करत अनेकजण रस्त्यावर फिरत असताना पहायला मिळाले.त्यामुळे पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच कारवाईला सुरूवात केली.. सकाळी मार्निग वॉकला जाणारे तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत पोलिसांनी ५०० पेक्षा अधिक गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget