लॉकडाऊन नंतर देशांतर्गत विमान प्रवासासाठी एअर इंडियाचे बुकिंग सुरू

नवी दिल्ली - देशातला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्यानंतर या काळात रेल्वे, विमान सेवाही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या सेवा नेमक्या कधी सुरु होणार याबद्दलही चर्चा सुरु आहे. त्यात शनिवारी एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीने ३ मे नंतर काही ठराविक डोमेस्टीक फ्लाईटचे बुकिंग सुरु केल्याचे म्हटले आहे.एअर इंडिया वेबसाईटच्या होमपेजवर असा मेसेज आहे. त्यात आंतरराष्ट्रीय सेवेचेही चित्र स्पष्ट होत आहे. कारण आंतराराष्ट्रीय विमानसेवेसाठीचे बुकिंग ३१ मे पर्यंत बंद करण्यात आले आहे. १ जून नंतरच्याच प्रवासासाठी बुकिंग सुरु आहे. अर्थात वेळोवेळी स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही यात म्हटले आहे. एअर इंडिया ही सरकारी विमान कंपनी आहे, त्यामुळे एअर इंडिया पाठोपाठ आता खासगी विमान सेवाही अशाच पद्धतीने बुकिंग सुरु करतात का याची उत्सुकता आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget