तीन महिन्यांची शालेय फि माफ करा. - सागर तुर्डे (मनविसे )

वसई - देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे. राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक छोटेमोठे लघुउद्योग बंद आहेत त्यामुळे नोकरदारवर्ग अनेक दिवसांपासून कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या घरात राहून कोरोनावर मात करत करतआहेत व लॉकडाऊनचे व राज्य सरकारच्या सूचनांचे उत्तमरीत्या पालन करत आहेत.त्यामुळे अनेक नागरिक आर्थिक संकटात सापडले गेले आहेत अश्यातच अनेक खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांच्या मासिक फी करीता विचारणा होत आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नालासोपारा शहरसचिव श्री .सागर तुर्डे यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवजी ठाकरेसाहेब यांच्याकडे आपले सरकार पोर्टलद्वारे पत्रव्यवहार करत शाळांविरोधात आपले सरकार पोर्टलवर तक्रार अर्ज (टोकन आयडी क्रमांक Dept/SESD/२०२०/११५३२) दाखल केला. इयत्ता १ली ते १० पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची मार्च, एप्रिल ,व मे अश्या ३ महिन्यांची मासिक फी माफ करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget