तुम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे का? चाहत्याच्या प्रश्नावर अमिताभ म्हणाले

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो, व्हिडीओ, विविध प्रकारच्या पोस्ट आणि ब्लॉग्सच्या माध्यमातून बिग बी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. अलिकडेच त्यांनी आपल्या ऑनलाईन ब्लॉगची १२ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने त्यांनी एका इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटचे आयोजन केले होते. या चॅटमध्ये चाहते त्यांना प्रश्न विचारत होते आणि अमिताभ त्या प्रश्नांची उत्तरे देत होते. दरम्यान एका चाहत्याने त्यांना असा काही प्रश्न विचारला ज्याचे उत्तर देताना जणू बिग बींना घामच फुटला.“सर कधी काळी तुम्हाला देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा होती, हे खरे आहे का?” असा प्रश्न त्यांना विचारला. यावर बिग बी म्हणाले, शुभ शुभ बोलो.१९८४ साली अमिताभ यांनी अलाहबाद येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला गेला असे म्हटले जात आहे. खरे कारण काहीही असले तरी त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी त्यांच्या बोलण्याच्या शैलीची चुलना पंतप्रधान मोदींच्या शैलीशीही केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget