कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाहरूखने महानगरपालिकेला दिले आपले ऑफिस

मुंबई - कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे.कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सगळ्याच स्तरावरून मदतीचे हात पुढे येत आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख देखील मदतीसाठी पुढे सरसावला आहे. शाहरूखने यावेळी वेगवेगळ्या स्तरावर कौतुक केले आहे. शाहरूखने आपले ऑफिस महानगरपालिकेकरता उपलब्ध करून दिले आहे. शाहरूख खानने आपले चार मजली कार्यालय कोरोनाशी संबंधित क्वारंटाईन उपकरणांसाठी महानगरपालिकेला उपलब्ध करून दिले आहे. याकरता महानगरपालिकेने ट्विटकरून शाहरूखचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील शाहरूख खानचे आभार मानले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशातच सर्व सिनेमांच शुटिंग बंद आहे. कलाकार मंडळी देखील आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget