कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडे १३ हजार अर्ज

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या लढ्यात इतरांनी शासनाला मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मागील तीन दिवसात १३ हजार लोकांनी राज्य सरकारकडे यासाठी अर्ज केले आहेत. निवृत्त लोकांनी यासाठी अर्ज करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. तरीही सध्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांनीही यासाठी अर्ज केले आहेत. यात डॉक्टर्स, नर्स, फार्मासिस्ट यासह शिक्षक, आयटी आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनीही अर्ज केले आहेत. 
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळात आहे. राज्य सरकारकडे पहिल्या तीन दिवसात १२९०० अर्ज इ मेलद्वारे आले आहेत. या सर्व लोकांना सरकारकडून आणखी एक अर्ज भरून पाठवण्यासाठी मेल करण्यात आला. हा दुसरा अर्ज ९ हजार ५६ लोकांनी भरून पाठवला आहे. ३४ जिल्ह्यातून यासाठी अर्ज आले असून यात सर्वाधिक अर्ज मुंबईतून आले असून त्याखालोखाल पुण्यातून अर्ज आले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget