आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला - अनिल देशमुख

मुंबई - आयपीएस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचा अधिकार केंद्राला असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. वाधवानप्रकरणी गृहमंत्री जबाबदार असून देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. याला गृहमंत्री देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेत्यांना आवाहन आहे की त्यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून कारवाई करावी असे देशमुख म्हणाले. 
अमिताभ गुप्ता यांची अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक चौकशी करणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आता सरकार त्यांची चौकशी करणार असल्याचे देशमुख यावेळी म्हणाले.लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असताना वाधवान कुटुंबियांनी मुंबई - खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला. व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट घेणाऱ्या दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (डीएचएफएल) प्रवर्तक, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम १८८ अन्वये देशव्यापी लॉकडाऊनमुळे जारी केलेल्या कलम १४४ अंतर्गत कोरोना व्हायरस काळात प्रवास करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाधवान यांच्यावर आयपीसी १८८, २६९, २७०, ३४ त्याच बरोबर आपत्कालिन व्यवस्थानच्या सेक्शन ५१ बी तसेच कोविड १९ च्या सेक्शन ११ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget