कोरोनाशी लढा देण्यात पंतप्रधान मोदी जगामध्ये पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस माहामारी वेळी लोकप्रियतेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ल्ड लिडर्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहचले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल डेटा इंटेलिजेन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजेन्सने एक रेटिंग यादी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील नेत्यांची कार्य करण्याची क्षमता आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास लक्षात घेऊन हे रेटिंग जाहीर करण्यात आले आहे.
रेटिंगमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रुवल रेटिंग जगातील इतर सर्व नेत्यांहून सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. या रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी +६८ अप्रुवल पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत. 
तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना उणे (-३) अप्रुवल रेटिंग पॉईंट्स मिळाले आहेत. १० नेत्यांच्या या यादीमध्ये ट्रम्प आठव्या क्रमांकावर आहेत. या रेटिंगसाठी, १ जानेवारी २०२० ते १४ एप्रिल २०२० पर्यंत लोकांना जगातील इतर नेत्यांशी संबंधित प्रश्न विचारले गेले होते. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget