कल्याण-डोंबिवलीत कोरोना विषाणू पसरतोय

कल्याण - कल्याण-डोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. शनिवारी एकाच दिवशी १३ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १२ रुग्ण हे डोंबिवलीतील आहे. एक रुग्ण हा कल्याणमधील आहे. डोंबिवली कोरोना रुग्णांचा हॉटस्पॉट झाली आहे. नव्याने आढळून आलेल्या १३ रुग्णांमुळे महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७३ झाली आहे.एक वर्षाच्या मुलीसह डोंबिवली पश्चिमेत तीन महिला व तीन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील तीन महिला व तीन पुरुषांना लागण झालेली आहे. हे सगळे जण कोराना बाधित रुग्णांच्या सहवासात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 
कल्याण पश्चिमेतील ६५ वर्षीय वृद्धाला लागण झाली आहे. त्यांचा परदेश गमनाचा इतिहास आहे. कल्याण डोंबिवलीत दररोज नवे रुग्ण मिळून येण्याची संख्या १ ते ६ या दरम्यान होती. त्यात अचानक लक्षणीय वाढ झाली आहे. आत्तापर्यंत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २६ जणांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४५ आहे. ४५ पैकी ११ रुग्ण हे नियॉन या रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे खाजगी रुग्णालय कोरोनासाठी डेडीकेटेट रुग्णालय घोषित केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget