उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच कायम ?

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदावरून राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अजूनही उद्धव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे आता या निर्णयावर दिल्लीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या कॅबिनेटने उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य करण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे. या प्रकरणी भगतसिंग कोश्यारी यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल यांचा सल्ला विचारण्याची भूमिका घेतली होती. पण, आता राज्यपालांची दिल्लीत चर्चा झाल्यावरच या विषयावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यासाठी ते राष्ट्रपतींशीही चर्चा करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
विशेष म्हणजे, हा मुद्दा सामजस्यांने सोडावा असे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटत आहे. यासाठीच शिवसेना नेते अरविंद सावंत आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी राज्यपालांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली. राज्यपालांसोबत सेना नेत्यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेतून मार्ग निघावा यासाठी सेनेचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, पण पुढे कोणताही पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून आताच सामोपचाराने चर्चा सुरू आहे.
एकीकडे चर्चा सुरू असताना संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका करून आणखी वाद वाढवला. गेल्या १६ दिवसांपासून राज्यपालांनी या प्रकरणी कोणताही निर्णय न घेतल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केले होते.त्यांच्या या ट्वीटमुळे राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोनच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य देण्यावरून चर्चा झाल्याचे कळते. 
उद्धव ठाकरे हे विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. असे असताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना मुख्यमंत्रिपदावर ६ महिने राहता येते. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला २८ मे रोजी ६ महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget