ठाण्यात घाऊक दुकानदारांवर ठाणे महापालिकेचे निर्बंध

ठाणे - जांभळीनाका येथील भाजीपाला बाजार गर्दीमुळे बंद करण्यात आला त्याचबरोबरच तेथील घाऊक किराणामाल दुकानदारांनाही थेट किरकोळ विक्री करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी घेतला. हे घाऊक दुकानदार सामाजिक अंतराचे भान ठेवत नसल्याने त्यांच्यावर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. आता फोनवरून मालाची मागणी घेऊन त्यानुसार ती संबंधितांपर्यंत पोहोचवण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.करोना संसर्ग रोखण्यासाठी किराणामाल दुकानदारांनी सामाजिक सुरक्षित वावराच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. तसे न केल्यास नियम धाब्यावर बसवणाऱ्या दुकानदारांची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. या निर्णयामुळे आता जांभळी नाका येथील किराणा घाऊक दुकानांतून ग्राहकांना थेट सामान विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. घाऊक विक्रेत्यांना फोनद्वारे किंवा ऑनलाइन नोंदणी घेऊनच त्यांचा माल किरकोळ विक्रेत्यांच्या दुकानांत थेट पोहोचवावा लागणार आहे. घाऊक विक्रेत्यांना कुठल्याही परिस्थितीत किरकोळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विक्री करता येणार नाही.कोणत्याही परिस्थितीत दुकानावर गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी. एकाच वेळी चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सामाजिक अंतराचे नियम पाळण्याची जबाबदारी दुकानदारांची असून त्यांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, तसेच साथ प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ नुसार कायदेशीर कारवाई करून दुकानांची नोंदणी रद्द करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget