नितीन सरदेसाईकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखाची मदत

मुंबई - संपूर्ण जगासमोर आज करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात खासकरुन महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारला आर्थिक मदतीची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. याच पार्शवभूमीवर देशातील व्यावसायिक आणि उद्योगपती सरकारला भरभरून मदत करीत आहेत.आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी आर्थिक सहाय्य केले आहे.नितीन सरदेसाई यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाखांचा धनादेश सुपूर्द केला. ‘कोरोना संकटाच्या काळात जमेल त्या पद्धतीने जनतेच्या मदतीस धावून जा’ असा आदेश राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना दिला आहे.पक्षाचे नेते श्री. नितीन सरदेसाई ह्यांनी काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १० लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच त्यांनी जनतेला एक आवाहन केले आहे की ज्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य आहे त्यांनी देखील असाच खारीचा वाटा उचलून सरकारला मदत करावी.मनसेकडून वेगवेगळया ठिकाणी धान्य वितरण, मास्क वाटप सुरु आहे. पण हे पुरेसे नसून, सरकारला प्रशासनाला आर्थिक मदतीची सुद्धा गरज आहे. प्रत्यकाने आपआपल्यपरीने सहाय्य करावे’ असे आवाहन नितीन सरदेसाई यांनी केले आहे
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget