कब्रस्तानात मृतदेह दफन करण्यास विरोध केल्याने अबू आजमी संतापले

मुंबई - मुंबईतील जोगेश्वरी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका ६५ वर्षीय रुग्णाचा मृतदेह दफन करण्यास मालाडमधील मालवणी येथील कब्रस्तानच्या विश्वस्तांनी विरोध केला. त्यामुळे अखेर हिंदु स्मशान भूमीत दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आजमी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करुन कसून चौकशी करुन दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी आजमी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.मृत कोरोना रुग्णाच्या नातेवाइकाने आरोप केला की, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आमच्या नातेवाईकाचा मृतदेह घेऊन आम्ही मालवणी येथील कब्रस्तानमध्ये गेलो. पण तेथील विश्वस्तांनी आम्हाला मृतदेह दफन करू दिला नाही. कारण तो कोरोनाचा रुग्ण होता. सरकारी अधिकाऱ्यांनी पहाटे चार वाजता दफन करण्यास परवानगी दिलेली असताना आम्हाला कब्रस्तानच्या विश्वस्तांनी विरोध केला.त्यानंतर निर्माण झालेल्या वादात अखेर पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दफन करू देण्याची विनंती विश्वस्तांकडे केली. पण, तरीही विश्वस्तांनी ऐकले नाही, असा आरोपही रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन हिंदू स्मशानभूमीमध्ये त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यामुळे अखेर त्या रुग्णावर दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत मालवणीचे आमदार आणि महाराष्ट्राचे मंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केले की, सरकारच्या नियमावलीनुसार कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर दहन करून अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे. तेही ज्या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाचा मृत्यू झाला तेथून जवळच अंत्यसंस्कार करावे, असे स्पष्ट आहे. मात्र संबंधित प्रकरणात मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट रुग्णालयातून आपल्या शहरात कब्रस्तानमध्ये नेला. याची कल्पनाही त्यांनी तेथील विश्वस्तांना दिली नाही आणि थेट त्यांनी मृतदेह दफन करण्याची परवानगी मागितली. आता मृतदेह कब्रस्तानमध्ये नेऊ देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही असलम शेख यांनी सांगितले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget