लॉकडाऊन संपल्यानंतर गर्दी होणार नाही याची काळजी घ्या – पंतप्रधानांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना

मुंबई - देशभरात सध्या २१ दिवसासाठी लॉकडाऊन आहे.१५ एप्रिलपासून लॉकडाऊन एकदम न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्याने नियोजन करा आणि एकदम लोंढे बाहेर येणार नाहीत याची काळजी घ्या, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांना केली. २१ दिवसांची तपश्चर्या वाया जाऊ देऊ नका, असे पंतप्रधानांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांनी आज विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सवरून संवाद साधला. त्यावेळी लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरच्या नियोजनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे मार्गदर्शन मागितले. त्यावर पंतप्रधान म्हणाले, राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे. कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे होऊ देऊ नका.शांती, सद्भाव आणि एकता राखा. कायदा आणि सुव्यवस्था टिकून रहील हे पाहा आणि त्यासाठी ड्रोन व अन्य तंत्रज्ञानाचा उपयोग करा, असे पंतप्रधानांनी सांगितले. 
परराज्यातील श्रमिक, कामगार यांची राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली. श्रमिक, कामगारांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ, डॉक्टर नियुक्त केले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
पुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेची ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग मधून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या प्रोटोकॉलप्रमाणे ( मानकाप्रमाणे ) आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये ताब्यात घेतले आहेत. पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget