महापालिकेत डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय पदासाठी भरती सुरु

मुंबई - कोरोना विषाणूने देशासहित राज्यात देखील थैमान घातले आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून वैद्यकीय कर्मचाऱ्यांची महाभरती सुरु करण्यात आली आहे या अंतर्गत महापालिकेत तात्पुरत्या स्वरुपात डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय या पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी सध्या महापालिकेच्या विभागीय कार्यालयाबाहेर मुलाखतींसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.
मुंबई महापालिका कोरोनाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांचे विभागीय कार्यालयाच्या बाहेर ‘वॉक इन इंटरव्यूव्ह’ घेण्यात येत आहेत. त्यासाठी अनेकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मुंबईत प्रत्येक विभागात प्रत्येकी २० डॉक्टर्स, ५० स्टाफ नर्स, ५० शिपाई/वॉर्ड बॉय यांची भरती होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामाचा वेळ आणि त्यासाठी मिळणाऱ्या वेतनाचेही तपशील दिले आहेत.







Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget