लॉकडाऊनमध्ये कोणालाही नोकरीवरुन काढू नका - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची मुदत ३ मेपर्यंत वाढवण्यासह सात गोष्टींवर देशाचे सहकार्य मागितले. त्यापैकी सहाव्या मुद्दय़ावर ते म्हणाले की, जे लोक तुमच्या व्यवसायात किंवा उद्योगात काम करतात त्यांना काढू नका. त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगा असे पंतप्रधानांनी सांगितले. 
गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) देखील याबाबत इशारा दिला होता. ज्यामध्ये असे सांगितले गेले होते की, भारतात लॉकडाऊन दरम्यान नोकरींवर गंभीर संकट आहे. लॉकडाऊन दरम्यान लोक आपली घरे सोडत नसताना सर्वच क्षेत्रात नोकरीचे संकट आहे.आयएलओने आपल्या अहवालात असा इशारा दिला आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगभरातील १९.५ कोटी लोकांना पूर्णवेळ नोकरी गमवावी लागेल. दुसर्‍या महायुद्धानंतरचे सर्वात भयंकर संकट म्हणून आयएलओने त्याचे वर्णन केले आहे. आयएलओने म्हटले आहे की, परिस्थितीशी सामोरे जाण्यासाठी सर्वात कमी संसाधन देशांमध्ये भारत आहे.आयएलओची ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आहे, त्यानुसार कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारतातील असंघटित क्षेत्रातील सुमारे ४० कोटी लोक गरीब होऊ शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा लोकांना अपील केले आहे की त्यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांना नोकरीवरुन काढू नये, त्याआधी २४ मार्च रोजी ते म्हणाले होते की कोणाचे पगार कापू नका. याचा सरळ अर्थ असा आहे की देशात सतत वाढत्या आर्थिक संकटामुळे लोकांच्या नोकर्‍या, पदोन्नती आणि पगाराचा धोका आहे. केवळ भारतच नाही तर अमेरिका, लंडन, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि इतर विकसित देशही या संकटाला तोंड देत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget