‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे

मुंबई - सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे.देशामध्ये लॉकडाऊन आहे सगळ्यांनी नियम पाळले पाहिजे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात आरोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, तसेच मरकजच्या आयोजकांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे, असे खळबळजनक वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी केले. निवडणुकीच्या कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
आज कोरोना विषाणूचं गंभीर संकट उभे आहे. सर्वच यंत्रणा काम करत आहेत. पोलीस आणि डॉक्टर चांगले काम करत आहे. डॉक्टर लोक जीव धोक्यात घालून काम करत आहेत आणि या डॉक्टरांवर हल्ला करण्यात येतो. ही बाब खूप गंभीर आहे. अशा मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल करायला हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही, असे राज ठाकरे यांनी ठणकावले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधानांच्या वक्तव्यात आशेचा किरण दिसायला हवा होता, असे ते म्हणाले.कोरोना संकटावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणालेत, इतकी शांतता आपण १९९२-९३ च्या दंगलीतही पाहिली नव्हती. असा प्रसंग आजपर्यंत कोणाच्या आयुष्यात आला नव्हता. एखाद्या देशात एखादी घटना घडते हे आपण पाहिले आहे. पण जगभर एकच गोष्ट घडत आहे, असे कोणी पाहिलेले नाही. 
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget