पोलीस उपनिरीक्षकाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

नाशिक - मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षाच्या आवारात उपनिरीक्षक अजझर शेख (४०) यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. कर्तव्यावर असताना स्वत:च्या सेवा पिस्तुलातून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली.शेख हे पोलीस उप अधीक्षक कार्यालयातील वाचक म्हणून कार्यरत होते. नियंत्रण कक्षात शनिवारी सायंकाळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, काही नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती. बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपअधीक्षक रत्नाकर नवले आदी अधिकारी उपस्थित होते.या बैठकीस अजहर शेख हेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर सर्व अधिकारी आपापल्या दालनात पोहोचले. त्यानंतर लगेचच साधारणत: पावणे पाच वाजेच्या सुमारास शेख यांनी स्वत:च्या पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेख यांनी आत्महत्या का केली, याचे कारण मात्र समजू शकले नाही.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget