मुंबई पोलीसातील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

मुंबई - पोलीस विभागातील आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कार्यरत असलेल्या जीआरपी पोलीस कर्मचाऱ्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे मुंबई पोलिसात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.वरळी कोळी वाड्यात राहणाऱ्या आणि मुंबई पोलीसांच्या प्रोटेक्शन विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कस्तुरबा रुग्णालयात या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असताना त्याचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला. या कर्मचाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांनाही विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.या कर्मचाऱ्यांचा आणखी किती जणांशी संपर्क आला आहे, याचाही शोध घेतला जात आहे. गजबजलेल्या वरळी कोळीवाड्यात ८० हजार लोकसंख्या असून याठिकाणी ३२ हजार घरे आहेत. या अगोदरच वरळी कोळीवाडा येथे १० पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळूल्याने पोलिसांनी हा संपूर्ण परिसर सील केलेला आहे. या परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आलेली असून वैद्यकीय पथकाकडून प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget