टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देणार - अजित पवार

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत तीन मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर कार्यक्रमासारखे बहुतांश व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत. असे असले तरी टप्प्याटप्याने अर्थव्यवस्थेला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनचे काटेकोर पालन यापुढेही सुरु राहील, त्याचबरोबर नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरु व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. 
कोरोनामुळे ठप्प असलेले व्यवहार टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. सोमवारी, २० एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, असे अजित पवार म्हणाले. देशात जाहीर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी कले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget