करिष्माची मुलगी लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण ?

मुंबई -  अनन्या पांडे, प्रनूतन बहल, वर्धन पुरी यांसारख्या स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये २०१९ मध्ये पदार्पण केले आहे. प्रत्येक वर्षी स्टार किड्स बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात असतात. सुहाना खान, खुशी कपूर, न्यासा देवगन हे स्टार किड्स देखील लवकरच बॉलिवूडमध्ये पाय ठेवतील अशा चर्चा रंगत आहेत. तर दुसरीकडे अभिनेत्री करिष्मा कपूरची मुलगी समायरा देखील बॉलिवूड डेब्यू करणार का ? अशा चर्चा रंगत आहेत. या सर्व वाऱ्यासारख्या पसरलेल्या चर्चांना खुद्द करिष्माने उत्तर दिले आहे. 
स्पॉडबॉय सोबत साधलेल्या संवादात तिने या विषयी खुलासा केला आहे. यावेळी करिष्माला तुझी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, 'हे बिलकूल खरे नाही. सध्या ती अनेक नव्या गोष्टी आत्मसात करत आहे. ती लहान आहे आणि शालेय शिक्षण घेत आहे.' असे करिष्मा म्हणाली. म्हणजे करिष्माच्या मुलीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांना तुर्तास प्रतिक्षा करावी लागणार हे मात्र याठिकाणी स्पष्ट झालं आहे. दरम्यान करिष्मा कपूर अनेक वर्ष अभिनयापासून दूर राहिली आहे. पण आता ती एका वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. एकता कपूरच्या ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजच्या माध्यमातून ती पुन्हा कलाविश्वात पाय ठेवणार आहे. 'मेंटलहुड' असे या वेब सीरिजचे नाव असणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget