देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाऊन ; पंतप्रधान मोदींची घोषणा

नवी दिल्ली - जगात कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे देशातील नुकसान टळले आहे. कोणाला जेवणाचा, कोणाला येण्या-जाण्याचा त्रास झाला, तुम्ही सगळयांनी हा त्रास सहन केला. तुम्ही शिस्तबद्ध सैनिकासारखे आपले कर्तव्य बजावत आहात. मी तुम्हाला सलाम करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.कोरोनाचे संकट लक्षात घेता आणि सगळ्यांच्या मागणीचा विचार करुन ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची मोठी घोषणा मोदी यांनी यावेळी केली. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले होते. आज १४ एप्रिलला हे लॉकडाऊन संपणार होता. मात्र कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मोदी यांनी लॉकडाऊनचा कालवधी वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊन उठवले तर गंभीर परिणाम दिसून येतील, असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेने केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊन वाढल्याची घोषणा केली आहे. 
लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्यांनी केलेल्या सूचनांनंतर करण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. कोरोनाविरोधातल्या लढाईत आता कठोरता वाढवण्यात येणार आहे. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक गोष्ट बारकाईने केला जाईल. प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. प्रत्येक क्षेत्राचे मुल्यांकन करण्यात येईल. जिथे कोरोनाचे रुग्ण कमी आढळतील, जिथे हॉटस्पॉट वाढणार नाही, अशा ठिकाणी २० एप्रिलनंतर काही काही सेवा सुरु केल्या जातील. सरकारकडून यासंदर्भात एक गाईडलाईन जारी करण्यात येईल, असे ते म्हणाले आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget