रत्नागिरीत बचत गटांच्या माध्यमातून लाखो मास्कची निर्मिती

रत्नागिरी - कोरोनामुळे देशात मास्क आणि सॅनिटायझरची मागणी देखील वाढली. अशावेळी ग्रामीण भागातील बचत गटांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. बचत गटांच्या माध्यमातून सध्या लाखो मास्कची निर्मिती केली जात असून यामध्ये रत्नागिरी जिल्हा राज्यात अव्वल आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कची कमतरता भासली पण बचत गटांनी ती भरून काढली. रत्नागिरीप्रमाणे राज्यातल्या कानाकोपऱ्यात सध्या बचत गटाच्या माध्यमातून कोरोनाविरूद्धच्या या लढाईत लागले आहेत. आपला संसार सांभाळत ही सारी खटाटोप रात्रंदिवस सुरू आहे.या माध्यमातून लाखो मास्कची निर्मिती झाली आहे. शिवाय राज्याचा विचार करता करोडो रूपयांची उलाढाल देखील होत आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात आजघडीला बचत गट अर्थात स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून तब्बल १ लाख १८ हजार ४८५ मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यात सर्वाधिक अर्थात ७६ हजार ४०१ मास्कची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले.Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget