महत्त्वाची बातमी ; लॉकडाऊननंतरही रेल्वेसेवा सुरु होणार नाही

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता विळखा पाहता देशभरात काही दिवसांपासून लॉकडाऊऩची परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन अवघ्या काही दिवसांनी संपणार आहे. त्याच धर्तीवर लॉकडाऊनच्या या कालावधीनंतर म्हणजेच १५ एप्रिलपासून भारतीय रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत सुरु होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. 
रेल्वे सुविधांविषयी होणाऱ्या या चर्चा पाहता गुरुवारी भारतीय रेल्वे विभागाकडूनच याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती स्पष्ट करण्यात आली. ज्यामध्ये त्यांनी १५ एप्रिलपासून रेल्वेसेवा पूर्ववत होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. शिवाय प्रवाशांना नव्या प्रवासी नियमांचे पालन करावे लागणार असल्याचे वृत्तही फेटाळण्यात आले आहे. 
रेल्वे सेवा सुरु होणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्याचे पाहून अखेर भारतीय रेल्वे विभागाकडून याविषयी अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले. प्रवाशांनी अपेक्षित रेल्वेने प्रवास करण्यासाठी वेळेच्या अमुक इतके तास आधील रेल्वे स्थानकांवर पोहोचावे, शिवाय प्रवाशांना यादरम्यान थर्मल स्क्रीनिंगचा टप्पाही पार करावा लागणार आहे, अशा बऱ्याच अफवांनी जोर धरला होता. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget