ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथचा कोरोनामुळे मृत्यू

लंडन - कोरोना विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगभरात या विषाणूने थैमान घातला आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्याही वाढतच चालली आहे. यामध्ये आता एका ब्रिटीश अभिनेत्रीचाही समावेश झाला आहे. ब्रिटीश अभिनेत्री हिलरी हीथ यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अभिनेत्री हिलरी हीथचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांचा धर्म-पुत्र अॅलेक्स विलियम्सने फेसबुकच्या माध्यमातून दिली. गेल्या आठवड्यात ३ एप्रिलला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
इंग्लंडच्या लिवरपूलमध्ये हिलरी हीथ यांचा जन्म झाला होता. त्या ७४ वर्षाच्या होत्या. हिलरी या हॉरर सिनेमा मधील त्यांच्या सारा लोवेस या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. त्यांनी १९६८ मध्ये अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. हिलरी या अनेक प्रसिद्ध सिनेमा आणि टीव्ही-शोच्या निर्मात्याही होत्या. त्यांचे पहिले पती डंकन हीथ यांच्याशी १९८९ मध्ये घटस्फोटानंतर त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. हिलरी या लंडन स्टेजसोबतही जोडलेल्या होत्या. त्यांना लॉरा हीथ आणि डॅनिअल हीथ ही दोन मुले आहेत.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget