चीनची भारताला मदत ;५० हजार पीपीई कीट, वैद्यकीय सामग्रीसह 'ब्लू डार्ट' भारतात दाखल

गुवाहटी - भारतात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्यसेविकांसाठी अत्यावश्यक पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स (पीपीई) चीनने मदतीच्या स्वरुपात भारताला दिले आहेत. चीनमधून वैद्यकीय सामग्रीसह ५० हजार 'पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट'(पीपीई) किट्सची खेप गुवाहटी येथे पोहोचली आहे.ब्ल्यू डार्ट एअर कार्गो हे चीनधील गुआंगझौहून येथून आज गुवाहटी येथे ५० हजार 'पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट'(पीपीई) किट्स आणि वैद्यकीय सामग्री घेऊन पोहोचले आहे. आसाम आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूशी लढत असलेल्या देशांना मदत करण्याच्या चीन सरकारच्या धोरणानुसार हे किट्स भारताला मदत स्वरुपात देण्यात आले.दरम्यान चीनमधून कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट्सही येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल ३ लाख रॅपिड टेस्टिंग किट्स असणार आहेत. त्यामुळे कोरोना चाचण्या जलदगतीने करणे शक्य होणार आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget