इराणमधून आलेले भारतीय मुंबईहून श्रीनगरला रवाना

मुंबई - इराणमधून मुंबईत आलेल्या ४४ भारतीय नागरिकांची कॉरंटाईन प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना त्यांच्या मूळ गावी श्रीनगर, लडाखला काल पोहोचविण्यात आले. इराणमधून १३ मार्च रोजी आणलेल्या ४४ जणांना भारतीय नौदलाच्या घाटकोपर येथील मटेरिअल ऑर्गनायजेशन कॅम्पमध्ये कॉरन्टाइन करण्यात आले होते.या नागरिकांनी ३० दिवस कॉरंटाईनमध्ये राहण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची कोरोनाची पुन्हा तपासणी करण्यात आली त्याचे अहवाल नकारात्मक आले. नौदलाच्या वैद्यकीय पथकातील अधिकारी या नागरिकांच्या दैनंदिन परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.
वाचनालय, टीव्ही, इनडोअर गेम, छोटी व्यायामशाळा व मर्यादित प्रमाणात क्रिकेट अशा विविध सुविधा नौदलातर्फे त्यांना पुरवण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवर लॉकडाऊन झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीतही त्यांना सर्व सुविधा सुरळीतपणे पुरवण्यात आल्या. लॉकडाऊनमुळे त्यांना श्रीनगर व लडाख ला जाणे अशक्य झाले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या सी-१३० या विशेष विमानाने त्यांना श्रीनगरला नेण्यात आले. घरी पोहोचेपर्यंत त्यांना पॅकेज फूड देण्यात आले.

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget