गाडीवर आमदारांचे स्टिकर लावून फिरणाऱ्याला अटक

मुंबई - देशभरात लॉकडाऊन असल्याकारणाने जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. दिनांक १६/०४/२०२० रोजी हॉटेल साई प्रसाद जवळ, पश्चिम द्रुतगती मार्ग, अंधेरी, पूर्व, मुंबई. येथे नाकाबंदी दरम्यान स. पो. आ. श्री सुरेश पाटील, अंधेरी विभाग, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय बेळगे अंधेरी पोलिस ठाणे हे नाकाबंदीस हजर असताना मोहम्मद साबेत असलम शहा वय २० वर्ष हा स्वतः लोकप्रतिनिधी नसताना लॉकडाऊन दरम्यान कोणीही वाहन अडवू नये म्हणून स्वतःच्या ताब्यातील होंडा आयव्हीटेक मोटार वाहन क्रमांक MH-01-AC-5240 या वाहनावर महाराष्ट्र विधानसभा आमदार अशा आशयाचे भारताची राजमुद्रा असलेले स्टिकर चिटकवून लोकसेवक वापरतो तसे चिन्ह वापरून स्वतःच्या गाडीवर लावून फिरत होता.महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाने कोरणा विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांच्या जीवितास धोकादायक असलेला करोना या रोगाचा संसर्ग पसरवण्याचे संभव असलेली कृती केल्या प्रकरणी इसम नामे मोहम्मद साबेत असलम शहा वय २० वर्ष यांचे विरुद्ध गु.नों.क्र. ३१९/२०, कलम ४६५,४१९,२६९, २७०, १८८, १७०,१७१ भादवि सह कलम ५१(ब), राष्ट्रीय आपत्ती कायदा सहा कलम २,३,४ साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सह कलम ३,४,७ द. स्टेट एम्ब्लेम ऑफ इंडिया अॅक्ट कलमान्वये गुन्हा नोंद झाला.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget