चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

मुंबई - चिथावणीखोर वक्तव्य करत सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी शनिवारी अटक केली. फेसबुक लाईव्ह करत त्याने बुधवारी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले होते. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि एजाजला अटक करण्यात आली. १५३अ, १२१, ११७, १८८, ५०१, ५०४, ५०५ (२) या कलमानुसार ही कारवाई करण्यात आली. 
खार पोलिसांचे एक पथक शनिवारी त्याच्या घरी गेले आणि त्याला अटक केली. सामाजिक शांतता भंग होईल असे कुणीही वक्तव्य करू नये असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र सोशल मीडियावरून सातत्याने अशी प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत कारवाई केली आहे. या आधीही एजाज खान अनेकदा वादात सापडला होता. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केली होती.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget