संजय राऊतांना सत्तेची मस्ती - नारायण राणे

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाचा पेच राज्यपालांच्या कोर्टात येऊन अडकला आहे. एकीकडे राज्यात कोरोनासारखी गंभीर परिस्थिती असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावर अद्याप कोणतीही भूमिका घेतली नाही. राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये असे विधान करत संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भुमिकेवर संशय व्यक्त केला. यावरुन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली.
राज्यपाल आणि राजभवन यांचे अनन्य साधारण महत्व आहे. खासदारकीची शपथ घेतलेल्या संजय राऊतला माहित नाही काय? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. सत्तेची मस्ती आल्यानेच संजय राऊतांकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द येत आहेत असेही राणे पुढे म्हणाले. सत्ता चंचल असते आज आहे उद्या नाही असे ते म्हणाले. शेवटी समझने वालों को इशारा काफी है! म्हणत त्यांना राऊतांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले. 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासंदर्भातल्या प्रस्तावावर अजूनही राज्यपालांनी सही केलेली नाही. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!', असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget