जम्मू-काश्मीरमध्ये ९ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

श्रीनगर - भारतीय लष्कराने काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान, या कारवाईत एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने काश्मीर खोऱ्यात विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे काल ४ दहशवादी मारले गेले. तर इतर ५ दहशतवादी नियंत्रण रेषेवरील केरन सेक्टरमध्ये ठार झाले आहेत. केरन सेक्टरमध्ये ठार झालेले दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसण्याच्या प्रयत्नात होते.
दरम्यान,या भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने जखमी जवानांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. अद्यापही हे ऑपरेशन सुरुच आहे, अशी माहिती देखील लष्करी सुत्रांनी दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget