राजस्थानमधील खासदार डॉक्टर करत आहेत रुग्णांची सेवा

राजस्थान - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच राजस्थामधील एक वृद्ध खासदार रोज २ तास रुग्णांची सेवा करत आहेत.राज्यसभेचे खासदार डॉक्टर किरोडी लाल मीणा यांनी एमबीबीएस केले आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बरीच वर्षे डॉक्टर म्हणून काम केले आहे. मात्र, राजकारणात आल्यानंतर ते यापासून दूर झाले. मात्र, आता या कठीण काळात ते जिल्ह्यातील महुआ भागातील खोर्रा मुल्ला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज दोन तास रुग्णांवर उपचार करत आहेत.खासदार मीणा सांगतात, की त्यांनी एमबीबीएस केले आहे. या महामारीच्या काळात त्यांना डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करायची संधी मिळाली, याचा त्यांना अभिमान वाटतो. ते पुढे सांगतात की, कोरोना महामारीने त्यांना त्यांचे जुने दिवस आठवून दिले.खासदार मीणा पुढे सांगतात, की या महामारीत खरे वॉरियर्स डॉक्टर, परिचारीका आणि पॅरामेडीकल विभागातील कर्मचारी आहे. हे लोक त्यांचे घर-दार सोडून रुग्णांची सेवा करत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget