भारतीय नौसेनेमधील जवानांना कोरोनाची लागण

मुंबई - देशात वेगाने पसरत चालला असून, कोरोना व्हायरसने आता आणखी रौद्र रूप धारण केले आहे. या कोरानाची भारतीय नौसेनेतील २१ जवानांना लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम नौसेना कमानीच्या तटावर असेलल्या लॉजिस्टिक आणि एडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट बेस INS आंग्रेवर २१ जणांमध्ये कोरोना व्हायरस आढळला आहे. या जवानांना आता नौसेनेच्या रूग्णालयात दाखल केले आहे. नौसेनेत कोरानाशी संबंधीत हे पहिलं प्रकरण आहे. एकाचवेळी एवढ्या जवानांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्या लोकांची तपासणी केली जात आहे. हे सर्व जवान INS आंग्रे येथे असलेल्या त्यांच्या रूममध्ये राहत होते. 
तपासात अशी माहिती मिळाली की, लॉकडाऊनमुळे हे सर्व जवान आपापल्या घरीच होते. बाहेर कुणाच्याही संपर्कात आले नव्हते. मात्र अद्याप ही माहिती मिळाली नाही की INS आंग्रेत येणाऱ्या कुणा अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही. 

Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget