गुजरातमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू

गुजरात - देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असली तरी मृत्यूच्या प्रमाणात गुजरात ८.३३ टक्के पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल पंजाब ७.८९ टक्के आणि हिमाचल प्रदेश ७.६९ टक्के या राज्यांची नोंद असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालातून निदर्शनास येते. दरम्यान, जगात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. आतापर्यंत जगभरात १४ लाख ३० हजार ५१६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ८२ हजार १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी ३ लाख १ हजार ८२८ जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत.देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५१५० वर पोहोचली आहे. सलग पाचव्या दिवशी ५०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत १५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच महाराष्ट्रातही नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत देशात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. झोपडपट्टीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढता दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget