पॉवरलूम कामगाराचा खून करून मारेकरी फरार ; पोलिसांचा शोध सुरु

ठाणे - भिवंडी शहरालगतच्या कारीवली येथील तलावाच्यापुढे एका यंत्रमाग कारखान्यातील कामगाराचा अज्ञात मारेकऱ्याने धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अजित स्वयंकांत पटेल (वय ४७, रा. बालाजी नगर, कारिवली) असे खून झालेल्या यंत्रमाग कामगाराचे नांव आहे.मृतक अजित हा यंत्रमाग कामगार भिवंडीतील भंडारी कंपाऊंड येथील कारखान्यात काम करीत होता. तो शनिवारी सकाळी यंत्रमाग कारखान्यातील लाईट बंद करण्यासाठी कारीवली तलावमार्गे रस्त्याने पायी निघाला होता. त्यावेळी तो तलावाच्या पुढे असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्याच्या पाठीत धारदार शस्त्र खुपसल्याने ते थेट हृदयात वर्मी लागले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 
हा खून चोरीच्या उद्देशाने केला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नरेश पवार हे करीत आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget