नवी मुंबईत फ्लेमिंगोंचा मुक्काम वाढला

नवी मुंबई - हिवाळ्याची चाहूल लागताच परदेशी पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून भारतात येत असतात. मात्र, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हे परदेशी पक्षी परतीच्या प्रवासाला निघतात. मात्र, यंदा एप्रिल उलटूनही या परदेशी पाहुण्यांचा वावर नवी मुंबईतील खाडी किनारी पाहायला मिळत आहे.
हिवाळ्याची चाहूल लागताच नवी मुंबईतील वाशी, ऐरोली, सीवूड तसेच उरण येथील खाडी किनारी मोठ्या प्रमाणात परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होत असते. आपल्या अन्नाच्या शोधात हे परदेशी पाहुणे हजारो किलो मीटरचा प्रवास करून दरवर्षी युरोपीय देशांमधून याठिकाणी येत असतात. अंदाजे फेब्रुवारीच्या दरम्यान ते पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला निघतात. परंतु, यंदा एप्रिल महिना आला तरी हे फ्लेमिंगो अद्याप इथेच वास्तव्यास आहेत.दुपारच्या दरम्यान हजारो फ्लेमिंगो पक्ष्याचा थवा हा नवी मुंबईतील सीवूड नजदीक असलेल्या खाडी किनारी पहायला मिळत आहे. सीवूड येथील करावे गावानजदिक असणाऱ्या खाडी किनाऱ्यावर आलेल्या हजारो फ्लेमिंगो चा थवा हा उंचावरून पाहतांना जणू खाडी किनाऱ्यावर गुलाबी चादर ओढलेय अशीच प्रचिती देऊन जातो.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget