नागरिकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

मुंबई - मुंबईतील नागरिकांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याबाबत घेतलेला निर्णय मुंबई महापालिकेने रद्द केला आहे. हृदयासंबंधीच्या धोक्याचे कारण सांगत बीएमसीने हा निर्णय मागे घेतला आहे. कोरोना विषाणूंचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईकरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कालच हा निर्णय जाहीर करण्यात आला होता.सरसकट लाखभर नागरिकांना हा डोस देण्याऐवजी आता फक्त काहीशे जणांनाच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. ‘कोरोना’ची लागण न झालेल्या मात्र क्वारंटाइन केलेल्या व्यक्ती, पोलिस आणि आरोग्य कर्मचारी यांनाच हा डोस दिला जाणार आहे. धारावीतील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ व्यक्तींनाही हा डोस दिला जाणार आहे.हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या मलेरियाच्या उपचारासाठी वापरल्या जातात. सध्या ‘कोरोना’ची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना हा डोस दिला जातो. मात्र हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या डोसमुळे कार्डिअॅक धोका उत्पन्न होण्याकडे काही तज्ज्ञ मंडळींनी लक्ष वेधले होते.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांचा डोस देण्यासंबंधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल माहिती दिली होती. वरळी आणि धारावी या ‘कोरोना हॉटस्पॉट’ असलेल्या परिसरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महापालिका हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देणार होती. वय वर्ष १८ ते ५५ वयोगटातील निरोगी नगारिकांना हा डोस दिला जाणार असल्याचे महापौर म्हणाल्या होत्या, परंतु आता हा निर्णय रद्द झाला आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget