वांद्रे स्टेशनबाहेर हजारोंची गर्दी, लॉकडाऊनचा उडाला फज्जा

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्याआधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे घोषित केले होते.एकीकडे देशात आणि राज्यात लॉकडाऊन वाढवलेला असताना मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनबाहेर हजारो लोकांनी गर्दी केली. पश्चिम बंगाल,उत्तर प्रदेश, बिहार येथील हे कामगार त्यांच्या मुळ ठिकाणी पोहोचण्यासाठी येथे जमले होते. गावाला जाण्यासाठी रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी या कामगारांनी केली होती.काही वेळानंतर पोलीसांनी गर्दी पांगवली आणि त्यांना पोलिसांकडून धान्य वाटप करण्यात आले.यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात होता.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे.. 'केंद्र सरकारने कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कोणताच निर्णय घेतला नसल्यामुळे वांद्रे स्टेशनबाहेर अशी परिस्थिती निर्माण झाली. सुरतमध्ये झालेली दंगलही याचाच परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा घर नको त्यांना त्यांच्या घरी जायचे आहे,' असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केले आहे. 
ज्या दिवसापासून ट्रेन बंद झाल्या तेव्हापासून आणखी २४ तासांसाठी ट्रेनसेवा सुरू ठेवावी, ज्यामुळे परराज्यातले कामगार त्यांच्या घरी परत जातील, अशी विनंती आम्ही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्येही हा मुद्दा उपस्थित केला होता. परराज्यातल्या कामगारांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी मोदींना केली होती,असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget