कोल्हापुरात आढळले आणखी २ कोरोनाबाधित

कोल्हापूर - आज कोल्हापूर जिल्ह्यात दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईहून कर्नाटकात आपल्या मूळ गावी जात असताना किनी टोल नाका येथे पकडलेल्या कंटेनरमधील ४२ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. तर इचलकरंजी येथील एका साठ वर्षाच्या व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे, आता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९ वर पोहोचली आहे.मुंबईहून कर्नाटकातील मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांना १६ एप्रिलला किनी टोलनाका येथे अडवून त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले होते. या प्रवाशांचे स्वॅब १७ एप्रिलला घेतले होते. त्यातील एका प्रवाशाचा रिपोर्ट रविवारी पॉझिटिव्ह आला होता. इचलकरंजी येथे लॉकडाऊन अगदी कडक पाळले जात आहे, असे असतानाही बाधित व्यक्ती नेमका कोणाच्या संपर्कात आला याबाबतची माहिती घेतली जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी ही माहिती दिली.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget