चीनच्या नागरिकांमध्ये अस्वस्थता, वुहानमध्ये आंदोलन

वुहान - करोना व्हायरसच्या फैलावाचे मुख्य केंद्र असलेले वुहान आता पूर्वपदावर आले आहे. तिथे व्यापार, वाहतूक सुरु झाली आहे. वुहानमध्ये लॉकडाउन संपला असला तरी तिथल्या नागरिकांमध्ये अस्वस्थतता कायम आहे. वुहानमधल्या छोटया दुकानदारांनी शहरातील एका मोठया मॉलबाहेर भाडे कमी करावे, यासाठी निदर्शने केली.लॉकडाउन नंतर वुहानमध्ये आंदोलन झाल्याची ही पहिली घटना आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तोंडाला मास्क बांधून, हातात घोषणांचे फलक घेऊन या दुकानदरांनी शुक्रवारी मॉलबाहेर निदर्शने केली. वर्षभराचे भाडे माफ करावे या मागणीसाठी दुकानदारांनी गुरुवारीही घोषणाबाजी केली होती. चिनी सोशल मीडियावर आंदोलनाचे हे व्हिडीओ सुद्धा अपलोड केले होते.
“आम्ही जगू शकत नाही. जागेच्या मालकाने सुरक्षा डिपॉझिटपोटी घेतलेली रक्कम आणि भाडे परत करावे” अशी एका महिलेने मागणी केली आहे. ग्रँड ओशन डिपार्टमेन्ट स्टोअरमध्ये तिचे दुकान आहे. आंदोलन करणारे ९९ टक्के छोटे दुकानदार असून भाडे माफी आमची मुख्य मागणी असल्याचे या महिलेने सांगितले. करोना व्हायरसमुळे व्यवसाय ठप्प असल्याने हातामध्ये पैसा नाही असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.
“आमच्या आंदोलनानंतर सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. पोलिसांनी बुधवारी मारहाण केली” असा आरोप दुसऱ्या एका आंदोलकाने केला. वुहानमधून जगभरात करोना व्हायरसचा फैलाव झाला. त्यामुळे २३ जानेवारीपासून वुहान पूर्णपणे बंद होते. वुहानच नाही तर हुबेई प्रांतातही हिंसक चकमकी झाल्या आहेत.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget