मुंबईत संचारबंदी मोडणाऱ्या ४,१३८ लोकांवर गुन्हे दाखल

मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, तरीही काही नागरिक नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी अशा ४ हजार १३८ लोकांविरुद्ध कडक कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.कोरोना संसर्गाचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केल्या जात आहेत. मुंबई पोलिसांकडून कलम १४४ शहरात लागू करण्यात आली असून संचारबंदी कायम करण्यात आलेली आहे. शहरात जागोजागी नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून आवाहन करण्यात येत आहे. मात्र, काही बेशिस्त नागरिक संचारबंदीचा नियम मोडताना पाहायला मिळत आहेत. अशांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असून २०मार्च ते ९ एप्रिल या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी एकूण ४१३८ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, नियमांचे उल्लंघन करणार्‍या २३१ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल ७३२ आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. यासोबतच ३१७४ आरोपींना पोलिसांनी जामिनावर सोडून दिले आहे.गेल्या २४ तासात मुंबई शहरात कलम १८८ नुसार पोलिसांनी तब्बल २७५ जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.
Labels:

Post a Comment

[facebook][blogger]
[blogger]

nagrikvarta

{facebook#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {twitter#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {google-plus#YOUR_SOCIAL_PROFILE_URL} {pinterest#YOUR_SOCIAL_PROFILE_URL}

Author Name

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget